Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, February 7, 2024

मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या राज्य उपप्रमुख ( बांधकाम कामगार विभाग ) पदावर विजयकुमार चव्हाण यांची नियुक्ती..



 सारा न्यूज नेटवर्क - 

मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या  राज्य उपप्रमुख ( बांधकाम कामगार विभाग ) पदावर विजयकुमार चव्हाण यांची नियुक्ती*

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर व राज्यातील आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक विषयावर शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता काम करणारे व कामगारांच्या विषयावर अनेकदा संघर्ष करणारे विजयकुमार चव्हाण यांची मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या  महाराष्ट्र राज्य उपप्रमुख ( बांधकाम कामगार विभाग ) पदी नियुक्ती करण्यात आली.

 मानव अधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख मेहबूब कादरी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ ओळखपत्र देऊन विजयकुमार चव्हाण यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

 त्यावेळी  मानव अधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष (आरोग्य विभाग) अकबर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष (आरोग्य विभाग )प्रवीण चांदेकर, सारा न्यूज नेटवर्क चे संपादक  राम हुंडारे, रवी रणदिवे, तोताबाई पवार, आदित्य दत्ता राठोड, अनिता राठोड, शैलेंद्र राठोड, नागेश बगाडे, परिवर्तन फाउंडेशन महिला जिल्हाध्यक्ष  लैला जमादार व अनेक मान्यवर उपस्थित होते.

 विजयकुमार यांना शुभेच्छा वर्षाव.

मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या  राज्य उपप्रमुख ( बांधकाम कामगार विभाग ) पदावर विजयकुमार चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल अनेक समाज कार्यकर्ते व मित्र परिवारांच्या वतीने विजय चव्हाण यांना शुभेच्छा देण्यात आले आहे.व तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  माध्यमातून ही शुभेच्छा चा वर्षाचा झाला आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment