सारा न्यूज नेटवर्क -
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालयाच्या बी ब्लॉक इमारती वरील नाम फलक तात्काळ दुरुस्ती करा.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयातील डी ब्लॉक इमारतीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाचे नाम फलक निघून पडल्याने त्यांची वाईट दुरावस्था झाल्याने तो फलक तात्काळ दुरुस्त करून बसवावे म्हणून अधिष्ठता सुधीर देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालय आहे या रुग्णालयात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या सीमेवरती भागातील अनेक नागरिक उपचारासाठी येतात या रुग्णालयातील अद्यावत असलेली बी ब्लॉक च्या इमारतीवर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालय या नामफलकाची गेल्या अनेक महिन्यापासून सिविल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विटंबना होऊन परराज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बदनामी होत आहे त्यामुळे तमाम शिवशंभु प्रेमींची भावना दुखावली आहे जाणून-बोजून सिविल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार मुद्दामच घडलेला आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे येत्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापूरसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान शिवशंभु प्रेमी सहन करणार नाहीत त्यामुळे सिविल प्रशासनाने तात्काळ शिवजयंती पूर्वी या नामफलकाची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने सिव्हिल प्रशासनास योग्य तो धडा शिकवला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके रमेश चव्हाण ओंकार कदम राजेंद्र माने अजित पाटील बाबासाहेब ननवरे रूपेश किरसावंरगी विजय बिल्लेगुरू आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालयाचे अधिष्ठता यांनी तात्काळ संबंधित विभागाला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालय नाम फलकाची दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश दिले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment