Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, April 12, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

स्वामी दर्शन घेतल्याने मनाला नवचैतन्य प्राप्त झाले - न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे 

श्री स्वामी समर्थांचे दर्शन व मंदीर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले मनोगत.


अक्कलकोट :- (श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१२/०४/२६)

          येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेता आल्याने मनाला नवचैतन्य प्राप्त झाले असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येऊन श्री स्वामी समर्थांचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे यांचा सपत्नीक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायमुर्ती आबासाहेब शिंदे बोलत होते. पुढे बोलताना न्यायमुर्ती शिंदे यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची दर्शन व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आहे. या मुळे सर्व स्वामी भक्त कमीत कमी वेळात दर्शन घेऊन माघारी जाऊ शकतात याचे मोठे समाधान आहे. आज येथे मंदीर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आदर तिथ्थ्याबद्दल आपण मंदी समितीचे विशेष आभारी आहोत असे सांगून देवस्थानच्या सेवा कार्यास आपल्या शुभेच्या असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, अक्कलकोटचे न्यायाधीश एन.ए.एल. शेख, सागर महिंद्रकर, स्वप्निल मोरे, अविनाश सुरवसे, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment