Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 20, 2026

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

वटवृक्ष मंदीरात 'रूप दिगंबर स्वामी' या भक्तीगीत अल्बमचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते प्रकाशन.


अक्कलकोट :- (श्रीशैल गवंडी,दि.१९/०४/२६)

       साडेतीन मुहूर्तांपैकी एक पुर्ण मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात आज 'रूप दिगंबर स्वामी' या भक्तीगीत अल्बमचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावात प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यानंतर मुंबई येथील वनश्रीताई पांडे यांच्या सोनचाफा प्रॉडक्शन निर्मित “रूप दिगंबर स्वामी” 

या भक्तीगीताचा अल्बम आज सकाळी ११.११ वाजता भक्तांच्या सेवेत सादर झाले.


        यावेळी बोलताना मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी मंदार चोलकर यांच्या लेखणीतून समृद्ध झालेले हे गीत, वरुण लिखते यांनी स्वरबद्ध केले असून, अभिजीत गुरु यांच्या संवेदनशील दिग्दर्शनातून साकारले आहे. तसेच सावनी रवीन्द्र, निहारिका जोशी आणि वैशालीताई सामंत यांच्या सुमधुर आवाजातून या गीताला एक दिव्य स्पर्श लाभला आहे. शर्मिष्ठा राऊत, भार्गवी चिर्मुळे, वसुधा देशपांडे, माधवी निमकर, सायली चौधरी, चेतना भाट, समिधा गुरु आणि वनश्री पांडे या सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयातून स्वामी भक्तीची अनुभूती जिवंत केली आहे. आज स्वामी चरणी हे गीत अर्पण करण्याची संधी मिळाली असल्याने कलाकारांसाठी, सर्व स्वामी भक्तांसह  आमच्यासाठी स्वामींची अनमोल कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी या गीताच्या माध्यमातून सर्वांना लाभणार आहे. या पवित्र दिवशी, स्वामींच्या चरणी भक्ती भावाने ओतप्रोत भरलेले एक सुंदर गीत अर्पण करण्याचा योग लाभला याचे समाधान गायक व कलाकारासह मंदीर समितीस आहे, तरी सर्व स्वामी भक्तांनी भक्तिगीत आवर्जून पाहावे आणि स्वामी नामस्मरणाचे  आयुष्यातील हे क्षण चिरस्मरणात साठवून घ्यावे असे आवाहन भाविकांना केले आहे. यावेळी मंदीर समितीच्या वतीने सर्व मान्यवर कलाकार व गायक यांचा चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अभिषेक निकम,

श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, प्रशांत उर्फ पप्पू गुरव, प्रसाद सोनार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, दर्शन घाटगे, विपूल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment