सारा न्यूज नेटवर्क -
वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात 'धर्म, अध्यात्म व समाजसेवेचा' त्रिवेणी संगम -
प्रसिद्ध गायक सुदेश भोसले
श्री स्वामी समर्थाचे दर्शन व महेश इंगळे यांच्या हस्ते झालेल्या सत्कारानंतर
प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांचे मनोगत.
अक्कलकोट :-(श्रीशैल गवंडी,दि.२८/०४/२६ )
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधेसह निवासाची व्यवस्था संस्थानच्या वतीने करत असल्याचे आपणास ज्ञात आहेच. समाज कार्य करणाऱ्या व स्वामीवर गाढ श्रद्धा ठेवून अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला वारंवार
भेटण्याचा योग येत आहे ही पण श्री स्वामी समर्थांची इच्छा आहे. महेश इंगळे यांची कल्पकता त्यांचा दूरदृष्टीकोन व भविष्यातील अनेक योजना ऐकून मी भावूक झालो. आज स्वामी दर्शनानंतर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यातून 'धर्म, अध्यात्म व समाजसेवेचा' त्रिवेणी संगम अनुभवला असल्याचे मनोगत प्रसिद्ध गायक सुदेश भोसले
यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास सपत्निक भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांचा सपत्निक मंदीर समितीच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना सुदेश भोसले
यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना गायक सुदेश भोसले यांनी ज्यांच्यामुळे सर्व योग जुळून आला ते माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपादृष्टीने स्वामी दर्शनाचा व महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मानीत होण्याचे भाग्य लाभले असल्याने आपण भारावलो असल्याचे मनोगतही गायक सुदेश भोसले यांनी व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, रमेश शिंदे सर, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
.........
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
Tuesday, April 28, 2026
SARA NEWS NETWORK
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment