सारा न्यूज नेटवर्क -
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विजापूर रोड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- श्री दत्त स्वामी समर्थ मंदिर सदिच्छा नगर माशाळ वस्ती जवळ विजापूर रोड सोलापूर येथे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमांमध्ये दि १३,१४,१५ दु २ ते ५ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ गुरुलिलामृत पोथीचे सामूहिक पारायण वाचन तसेच दि १४ एप्रिल रोजी दु ५ ते ७ रुक्मिणी भजनी मंडळ माढा कॉलनी जुळे सोलापूर यांचे गवळण भारुड व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तसेच दि १५ एप्रिल रोजी सायं ५ ते ७ श्री रघुराज चव्हाण यांचे आर्ट ऑफ लिविंग आत्मतरंग गायन ध्यान व ज्ञान कार्यक्रम ही आयोजित करण्यात आलेला आहे. महारती झाल्यानंतर महाप्रसादाचे दाते कु. मल्हार नितीन चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अशोक तरंगे (उपनिरीक्षक विजापूर नाका पोलीस ठाणे) व तसेच मंदिराचे अध्यक्ष श्री नागनाथ सुरवसे व श्री नितीन चव्हाण यांच्या हस्ते स्वामींची महाआरती होईल.
तरी सर्व स्वामी भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे आपली व उपस्थिती प्रार्थनीय आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment