Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, April 7, 2026

SARA NEWS NETWORK


सारा न्यूज नेटवर्क- 

 सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी अँड.मिलिंद कुलकर्णी;

 पदाधिकारी आणि संचालकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांच्या हस्ते सत्कार... 

 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. बँकेच्या नूतन संचालक मंडळाने एकमताने ही निवड केली.

नुकत्याच झालेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी झालेल्या नूतन संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी श्री. संतोषकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपनिबंधक तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी श्री. संतोषकुमार देशमुख यांनी सोलापूर जनता बँकेच्या मुख्य कार्यालयातील संचालक मंडळ सभागृहात निवडीची घोषणा केली. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. संतोषकुमार देशमुख यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संचालक पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, सी. ए. गिरीष बोरगावकर, रवींद्र साळे, संचालिका चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, संचालक डॉ. हर्षद डंबळ, सी. ए. आनंद करवंदे, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, प्रमोद भुतडा, विष्णू मोंढे, अॅड. मल्लिनाथ शहाबादे, अमित आपटे, चरणसिंग चौव्हाण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment