सारा न्यूज नेटवर्क -
गोरपीठ, प्रतापनगर तांडा, सोलापूर येथे होणार भव्य दोन दिवसीय यात्रौत्सव.... प्रकाशभाऊ राठोड यांचे भावी भक्तांना आवाहन
प्रतिनिधी (सोलापूर) :- संत हुनाबापू प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने प्रतापनगर तांडा येथे सालाबाद प्रमाणे यावर्षीही भव्य गोरपीठ यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आली आहे. या संस्थानचे प्रमुख तथा बंजारा धर्मवीर श्री प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार मंदिरात आदिशक्ती माता,संत शिरोमणी सेवालाल महाराज,भगवान श्री श्री हामुलाल महाराज आणि संत हुनाबापू यांची मूर्ती स्थापना करण्यात आलेली आहे. गोरपीठ वरती अतिशय भक्तिमय वातावरण असून त्याठिकाणी आसपासाच्या परिसरातील हजारो भाविकभक्त दर्शनाकरिता येतात त्याचबरोबर दर अमावस्या पौर्णिमेला भाविकांची विशेष गर्दी असते. या मंदिरात वर्षभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबविले जातात. जसे की होळी,दिवाळी, दसरा , गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा असे मोठमोठे सण उत्सव कार्यक्रम देखील साजरे केले जातात. हे बंजारा समाजाचे श्रद्धाचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे.
तरी या यात्रा उत्सवामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम दिनांक २ व ३ मे २०२६ या दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन गोरपीठ संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अनेक संत, महंत, पुजारी सामाजिक तसेच राजकीय नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शनिवार दि.२ मे २०२६ रोजी सायंकाळी भोग धार्मिक विधी पूजा रात्रभर भजन कार्यक्रम तसेच सुप्रसिद्ध गायक आकाश चव्हाण, तसेच प्रतापनगर तांडयातील अनेक कलाकार यांची उपस्थिती राहणार आहे तसेच रात्रभर बंजारा भजन गायन नृत्य सादर करण्यासाठी अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्यात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना गोरपीठ संस्थानच्या .प.पु मोतायाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण आणि सन्मान पत्र देण्यात येणार आहे.
दि.३ मे २०२६ रोजी सकाळी देवी देवतांचे अभिषेक स्नान पुजा भोग भंडारा व प्रसाद कार्यक्रम संपन्न होणार त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाजातून सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक,राजकीय, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बंधू भगिनींना सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सोलापूर जिल्यातील सर्व भाविक भक्तांनी या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे आवाहन गोरपीठ संस्थानच्या वतीने श्री नेहरू राठोड, सामाजिक कार्यकर्ता तसेच डॉक्टर श्रीमंत राठोड प्राचार्य ठाणे यांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
Tuesday, April 28, 2026
SARA NEWS NETWORK
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment