सारा न्यूज नेटवर्क -
गुरुवार ९ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ लिखित नाम जप पुस्तकाचे प्रकाशन होणार..
------------------------------------------------
सोलापूर :- दि.७/४/२६ श्री अखंड नामजप समिती सोलापूर च्या वतीने ९एप्रिल २०२६ गुरुवार रोजी श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अखंड नामजप समितीचे प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,
अखंड नामजप समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थांचे शतकोटी लिखित नामजप यज्ञाचा संकल्प केला असून त्या लिखित नाम जप पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार दि.९/४/२६ रोजी श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ भक्त श्री चोळप्पा महाराज यांचे चौथे वंशज नरेंद्र पुजारी (नाना महाराज) यांच्या हस्ते आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व स्वामीभक्त बंधू भगिनी यांनी सदर जप यज्ञ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अखंड नामजप समितीचे प्रमुख श्री विष्णु कारामपुरी (महाराज) सचिन चौधरी सर , प्रसाद जगताप पत्रकार यांनी केली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment