Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, April 14, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

श्री वटवृक्ष मंदीरात श्री गुरुलिलामृत पोथी पारायण सेवेची सोनियाताई गोरे, शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्या हस्ते समाप्ती.


अक्कलकोट :- (श्रीशैल गवंडी दि.१४/४/२०२६)

    श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी स्वामी महाराज देवस्थानमध्ये श्री.गुरुलिलामृत या ५५ आध्याय पोथीचा सामुदायिक पारायण सोहळ्याची समाप्ती आज देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या धर्मपत्नी सोनियाताई गोरे, तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या धर्मपत्नी तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्या हस्ते मोठया भक्तीभावाने करण्यात आली. 


      श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त सालाबादा प्रमाणे यंदाही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दि.०४ एप्रिल ते दि.१४ एप्रिल अखेर विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली संपन्न झालेल्या या पारायण सेवेची समाप्ती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मेहूणी शैलजा साळूंखे,  गौरीताई कल्याणशेट्टी, श्रीयाताई कल्याणशेट्टी पुजाताई कल्याणशेट्टी व वीरशैव महिला मंडळाचे अध्यक्षा लक्ष्मी अचलेर यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास २०० पेक्षा जास्त या सामुदायिक पारायण सेवेत सहभागी झालेल्या महिलांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या धर्मपत्नी सोनियाताई गोरे, तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या धर्मपत्नी तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्या हस्ते ओटी भरून मोठ्या भक्तीभावात या पारायण सेवेची समाप्ती करण्यात आली.




      यानंतर भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, कोल्हापूर, पुणे इत्यादी भागातून ४८ भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली या भजनसेवेचा सांगता सोहळा देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी यांच्या हस्ते संपन्न झाला. धर्मसंकीर्तन महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली.

पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख, भजनसेवा 

विश्वस्त महेश गोगी, बाळासाहेब एकबोटे, धर्मसंकीर्तन सोहळा चेअरमन महेश इंगळे व प्रा.ओंकार पाठक यांच्या अधिपत्याखाली पार पडले.



       यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी,  सुनिल पवार,

श्रीपाद सरदेशमुख, महेश मस्कले, सिध्दाराम कुंभार, गिरीश पवार, संजय पवार, बाळासाहेब घाटगे, प्रदीप हिंदोळे, सागर गोंडाळ, दीपक जरीपटके, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment