सारा न्यूज नेटवर्क -
आप्पा लंगोटे यांना पितृशोक सिद्राम रामचंद्र लंगोटे यांचे अल्पशा निधन
Friday, April 24, 2026
सोलापूर :- मजरेवाडी गावचे मूळ रहिवासी असलेले सिद्राम रामचंद्र लंगोटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सध्या ते जुळे सोलापूर परिसरातील बॉम्बे पार्क, रेणुका नगरजवळील लंगोटे वस्ती येथील शेतात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या जगात जन्म घेतलेल्या प्रत्येक मानवाला नव्हे तर जीवाला या जगाचा कधी ना कधी निरोप घ्यावाच लागतो जगाचा निरोप घेताना आपले सत्कर्मचांगली कामे जनमानसातील आपुलकीपणा आपल्या सोबत येतो असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ नागरिक सिद्राम रामचंद्र लंगोटे आपल्या सर्वातून निघून गेले यामुळे लंगोटे परिवार पोरका झाला असून दुःखाच्या छायेत आहे सिद्राम रामचंद्र लंगोटे यांनी आपल्या आयुष्यभर सतत चांगलेच कामे केली कोणाचेही मन दुखावले नाही पंचक्रोशीतील प्रत्येक समाजात ते सर्व मान्य असे व्यक्तिमत्व होते म्हणूनच त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का पोहोचला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सोलापूर शहरातील महत्त्वाचे असलेले मजरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी सिद्राम रामचंद्र लंगोटे हे वयाच्या ७२ व्या वर्षी आज पहाटे ठिक ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे ते मृत्यू समयी ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण लंगोटे परिवारासह संपूर्ण मजरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी , २ मुले, १ मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे
स्वर्गीय सिद्राम रामचंद्र लंगोटे यांच्यावर आज शुक्रवार दिनांक २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता येथील लंगोटे वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
ते कायम हसतमुख शांत व संयमी असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या निधनाने लंगोटे परिवारासह संपूर्ण मजरेवाडी गाव हळूहळू लागला आहे तर लंगोटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असा पिता होणे नव्हे अशा प्रतिक्रिया मित्र परिवारातून उमटत होत्या खरोखरच सिद्राम रामचंद्र लंगोटे हे अत्यंत शांत स्वभावाचे होते त्यांच्या लंगोटे परिवाराचे छत्र हरपले
ते पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष तथा तिसरी आँख मानवाधिकार संघटन, प्रदेशाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांचे वडील होत.
Friday, April 24, 2026
SARA NEWS NETWORK
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment