सारा न्यूज नेटवर्क -
🌍 जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती 🌱
सोलापूर(प्रतिनिधी):- महानगरपालिका, सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सोलापूर आणि इको नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळेच्या परिसरात देशी औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमवेत पर्यावरण संवर्धनाबाबत हितगुज संवाद साधण्यात आला. तसेच “एक विद्यार्थी – एक झाड” या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप भेट देण्यात आले.
सोलापूरच्या नूतन उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी यावेळी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. महेश देवकर सर तसेच वसुंधरा अभियानाचे पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर सर उपस्थित होते.
तसेच सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे कॅम्पस संचालक श्री. संजयजी नवले सर, प्राचार्या सौ. शाहीन शेख मॅडम, उपप्राचार्या सौ. निखत शेख मॅडम, उपप्राचार्य श्री. प्रकाश नवले सर, इको नेचर क्लबच्या संचालिका व कृतिशील शिक्षिका मंजुषा सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. तसेच वर्षभरात पर्यावरण व पृथ्वी संवर्धनासंदर्भात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
Tuesday, April 21, 2026
SARA NEWS NETWORK
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment