सारा न्यूज नेटवर्क -
सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महात्मा फुले यांचे महत्त्वाचे योगदान - नगरसेवक महेश इंगळे
स्विमिंग ग्रुपच्या वतीने जयंती निमित्त महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले मनोगत.
अक्कलकोट :- (श्रीशैल गवंडी, दि.११/०४/२६)
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८४८ मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे सन १८७३ साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून दिला. त्यांना १८८८ मध्ये 'महात्मा' ही पदवी देण्यात आली. महात्मा या पदवीला न्याय देवून स्त्री शिक्षणाचा पाया रचत सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महात्मा फुले यांचे महत्त्वाचे असल्याचे मनोगत येथील स्विमींग ग्रुपचे संस्थापक तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
आज येथील स्विमींग ग्रुपच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर संस्थापक महेश इंगळे बोलत होते. यावेळी प्रा.विद्याधर गुरव सर व अन्य मान्यवर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्विमिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश मालक इंगळे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, अप्पू मालक पराणे, ओंकार उटगे, संतोष जवळगे, डॉ.राजू मलंग, अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, महादेव आडीवीतोटे, चंद्रकांत सोनटक्के, रमेश शिंदे, विद्याधर गुरव, प्रथमेश इंगळे, मल्लिनाथ माळी, अशोक कलशेट्टी सर, कुमार हतुरे, रमेश कणमुसे, राजू एकबोटे, अरविंद पाटील, श्रीकांत झिपरे, आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment