सारा न्यूज नेटवर्क -
भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग - ह.भ.प. ज्ञानेश बुवा धानोरकर
श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर ह.भ.प.ज्ञानेश बुवा धानोरकर यांनी नारदीय कीर्तन सेवेतून गुंफली आठवी पुष्पमाला.
अक्कलकोट :- (श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१०/०४/२६)
वारकरी सांप्रदायाचा इतिहास आणि संत साहित्यातुन विश्वव्यापक मानवी जीवनाचे दर्शन होते. जीवनात आपले पणाची व अहंकारी भावनेचे बळ वाढते. अहंकाराला छेद देत संसार जिंकण्याची व संसार व परमार्थ यांची सांगड घालण्याची शिकवण भक्तीतुनच मिळते आणि या मार्गे भगवंताला आपलसं करून भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग असल्याचे निरुपण पुण्यातील ह.भ.प. ज्ञानेश बुवा धानोरकर यांनी केले.
आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवातील आठवे पुष्प ह.भ.प. ज्ञानेश बुवा धानोरकर यांनी आपल्या नारदीय कीर्तन सेवेतून गुंफले. यावेळी कीर्तन सेवेच्या पुर्व रंगात निरुपण करताना ह.भ.प. ज्ञानेश बुवा धानोरकर बोलत होते. पुढील कीर्तन सेवेत विशद करताना ह.भ.प. ज्ञानेश बुवा धानोरकर यांनी निरुपण केले की संतांनी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली. अभंग, ओवी, भारुड, गवळण इत्यादीच्या माध्यमातून परमार्थ सन्मुख मार्ग सांगीतला. वारकरी सांप्रदायास तात्विक बैठक देणारया संत ज्ञानेश्वरां पासुन सुरु झालेली ही भक्तीगंगा आजच्या विषमतेच्या वातावरणात अखंडीत ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, ही जबाबदारी प्रत्येकांनी सांभाळलीच पाहिजे. माणसाचे देवपण जेवढया प्रमाणात जागे होईल तेवढया प्रमाणात जग त्याला देवरुप दिसेल. मानवी जीवनात जी कांही शास्वत मुल्य आहेत ते म्हणजे संत साहित्य होय. सर्वच संतांनी जगाला आपल्या वाणीतून, कृतीतून नवी दिशा, नवे विचार दिले. म्हणुन आजच्या काळात त्यांच्या विचारांची समाजाला खुप गरज आहे. संतांच्या मांदियाळीने परमपावन झालेल्या या भुमीची ओळख टिकवून ठेवायची असेल तर भक्ती मार्गावरुन चाललं पाहिजे. संत तुकाराम महाराज यांनी ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भगवंताला केवळ भक्तीतूनच आपलसं केलं. आजच्या कलियुगात आपण सर्वानी या सर्व संत, पंत, नाथ, महात्म्यांचा हा आदर्श आजच्या समाजानं घेणं ही काळाची गरज आहे असेही निरुपण करुन संत परंपरेतील अनेक व्याख्यांचे दाखले देत कीर्तन सेवेची सांगता केली. या कीर्तन सेवेत ह.भ.प.ज्ञानेश बुवा धानोरकर यांना तबल्यावर सोलापूरचे प्रसाद कुलकर्णी, पखवाजवर पंढरपूरची ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियमवर ओंकार पाठक, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा.ओंकार पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांनी कीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश बुवा धानोरकर व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला.
यावेळी प्रथमेश इंगळे,सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीमुख जगदाळे, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, दिपक जरिपटके, प्रसाद किलजे, बाळासाहेब कुलकर्णी, बाळासाहेब एकबोटे, मनोज इंगुले, अमर पाटील, रमेश शिंदे सर, मनोज जाधव, ज्ञानेश्वर भोसले, संतोष पराणे, स्वामीनाथ लोणारी, प्रसाद सोनार, प्रशांत गुरव, महेश काटकर, प्रदिप हिंडोळे, खाजप्पा झंपले, गिरीश पवार, रविराव महिंद्रकर, प्रसाद पाटील सर, महादेव तेली, रमेश होमकर, लखन सुरवसे, शुभांगी पाठक, कौशल्या जाजू, सुरेखा तेली, अनिता करजगीकर, ज्योती जरीपटके, अनघा कुलकर्णी, नम्रता भाले, सुवर्णा जाधव, शालिनी पाटील आदींसह अनेक पुरुष व महिला भाविकभक्त उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment