Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 17, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क

सोलापुरात प्रथमच महिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – डॉ. तनुश्री परळे यांचे रुग्ण सेवेत पदार्पण 


सोलापूर :- सोलापूर शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच महिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोटविकार तज्ञ ) म्हणून डॉ. तनुश्री परळे या स्पंदन कार्डियाक अँड गॅस्ट्रो क्लिनिक आणि अश्विनी हॉस्पिटल , सोलापूर येथे रुग्णसेवा सुरू करणार आहेत.

डॉ. तनुश्री  यांनी आपले संपूर्ण वैद्यकीय प्रशिक्षण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांमधून पूर्ण  केले आहे. त्यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटलमधून एमबीबीएस केल्यानंतर प्रतिष्ठीत के.इ.एम हॉस्पिटल आणि सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज, (मुंबई) येथून एमडी (मेडिसिन) पूर्ण केले. त्यांचे गॅस्ट्रोएंन्टेरोलॉजी म्हणजेच पोट व लीव्हरच्या आजारांवरील सुपर स्पेशियालिटी ट्रेनिंग मुंबईतीलच प्रख्यात पी .डी . हिंदुजा हॉस्पिटल येथून झाले आहे . यानंतर त्यांनी  इआरसीपी आणि इयूएस यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे  प्रशिक्षण मॅक्स हॉस्पिटल साकेत (दिल्ली) येथे पूर्ण केले. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत अत्यंत कठीण समजली जाणारी युरोपियन स्पेशालिटी एक्सामिनॅशन(गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी) (ESEGH) उत्तीर्ण करून डेन्मार्कमधील आरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल (AUH) येथे पोटविकारांचे पुढील प्रशिक्षण घेतले आहे.

आपल्या करिअर मध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधील मर्यादित संसाधने व प्रचंड कामाचा ताण असो किंवा मोठ्या  कॉर्पोरेट हॉस्पिटल्समधील अत्याधुनिक सुविधा वापरून केलेली जटिल शस्त्रक्रिया असो, प्रत्येक प्रकारच्या  रुग्णावर  सर्वतोपरी उपचार करण्याचा अनुभव त्यांना या विविध संस्थांतुन काम करताना आला .या अनुभवाच्या जोरावर त्यांनी आता सोलापूरमधील  स्थानिक रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारी सेवा देण्याचा मानस व्यक्त केला.

डॉ . तनुश्री  यांनी  शेकडो एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी केल्या असून, बँडिंग, ग्लू इंजेक्शन, डायलटेशन, ईआरसीपी आणि ईयूएस यांसारख्या थेरप्यूटिक शस्त्रक्रियातही  त्यांनी प्राविण्य मिळवले आहे.  सर्वसाधारण अपचन, आम्लपित्त (GERD), पेप्टिक अल्सर बद्धकोष्ठता, इर्रिटॅबले बॉवेल सिन्ड्रोम , पोटदुखी यांसारख्या तक्रारींपासून ते कॉमन बाईल डक्ट स्टोन्स, कावीळ तसेच लिव्हरचे आजार, फॅटी लीव्हर, हिपॅटायटीस  ( लीव्हर ची सूज ),अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोहनस डिसीज, ( आतड्यांची सूज) अशा जटिल आजारांवरही त्या उपचार करतात.

विशेषतः  पाइल्स (मुळव्याध ),फिशर (भगंदर )किंवा फिस्टुला यांसारख्या समस्या असलेल्या महिलांना आपल्या तक्रारी मोकळेपणाने सांगणे आणि तपासून घेणे सोपे होणार आहे

डॉ. तनुश्री परळे या सोलापूरमधील अश्विनी हॉस्पिटल येथे सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत उपलब्ध असतील. स्पंदन कार्डियाक अँड गॅस्ट्रो क्लिनिक,  सातरस्ता  येथे दुपारी २ ते ५ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ऊपलब्ध असतील.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment