सारा न्यूज नेटवर्क -
अँड. देवयानी किणगी न्यायक्षेत्रातील युवा विधिज्ज्ञ पुरस्काराने सन्मानित...
सोलापूर (प्रतिनिधी) :- ज्येष्ठ विधिज्ञ कै. अँड. पी. डी. कुलकर्णी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कै. अँड. पी. डी. कुलकर्णी फौंडेशनतर्फे अँड. देवयानी किणगी यांना न्यायक्षेत्रातील सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदानाबद्दल युवा विधिज्ञ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमास माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अँड. प्राची कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ञ अँड. महेश अग्रवाल, सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष अँड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अँड. रियाज शेख, सचिव अँड. बसवराज हिंगमिरे, सहसचिव अँड. मीरा सिंग तसेच सहाय्यक सरकारी वकील अँड.आनंद कुर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment