Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, April 26, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - कु.साक्षी कल्याणशेट्टी, कु.पूजा मिरजे, कु.धानम्मा मिरजे यांचा पोलीस खात्यातील नोकरी प्रित्यर्थ महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सन्मान. अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.२६/०४/२६.) तालुक्यातील कु.साक्षी कल्याणशेट्टी हिला पालघर पोलीस कॉन्स्टेबलपदी, कु.पूजा मिरजे हिला बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबलपदी, कु.धानम्मा मिरजे हिला ठाणे पोलीस कॉन्स्टेबलपदी नोकरी लाभल्या प्रित्यर्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कु.साक्षी कल्याणशेट्टी, कु.पूजा मिरजे, कु.धानम्मा मिरजे यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र देवून सन्मान केला. यावेळी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी मनातील जिद्द व चिकाटीला आपले लक्ष बनवून परस्थितीशी संघर्ष करत कु.साक्षी कल्याणशेट्टी, कु.पूजा मिरजे, कु.धानम्मा मिरजे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल युवा नेते प्रथमेश मालक इंगळे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रथमेश मालक इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, वैभव जाधव, सुरेश कल्याणशेट्टी, संतोष मिरजे, मल्लिकार्जुन मिरजे, शांतप्पा मिरजे, भैरप्पा मिरजे, सिद्रामप्पा गंगदे, नीलम्मा गंगदे, सुशीलाबाई मिरजे, सुनील कटारे, शिवशरण अचलेर सर, श्रीशैल गवंडी, रमेश शिंदे सर, अमर पाटील, श्रीकांत मलवे, खाजप्पा झंपले, सुनिल पवार व अन्य उपस्थित होते. फोटो ओळ - श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कु.साक्षी कल्याणशेट्टी, कु.पूजा मिरजे, कु.धानम्मा मिरजे यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत. सारा न्यूज नेटवर्क संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment