Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 17, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 श्री स्वामी समर्थांचे सुलभ दर्शनाचे नियोजन म्हणजे भाविकांच्या श्रध्देचा सन्मान - ब्रम्हर्षी बनारस बाबू गुरुजी

ब्रम्हर्षी बनारस बाबू गुरुजी यांचा वटवृक्ष मंदीरात महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.


अक्कलकोट :- (श्रीशैल गवंडी, दि.१७/०४/२६) मंदीर समितीच्या सेवाभावी सेवेच्या माध्यमातून तथा श्री स्वामी समर्थांच्या सुलभ दर्शन प्रणालीतून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात आम्हाला लाभलेल्या सुलभ स्वामी दर्शनाने आम्ही गहिवरलो आहे. उच्च, नीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव स्वामींच्या दरबारी पहावयास मिळत नाही. सर्व स्वामी भक्तांना अत्यंत जलद गतीने सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ करून देत असल्याने मंदिर समितीचे स्वामी समर्थांचे सुलभ दर्शन व्यवस्थेचे नियोजन म्हणजे भाविकांच्या श्रध्देचा सन्मान असल्याचे मनोगत हैदराबाद येथील प्रसिद्ध श्री जगदंबा तीन शक्ती पीठाचे पीठाधीपती ब्रम्हर्षी बनारस बाबू गुरुजी यांनी व्यक्त केले.ते नुकतच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ब्रम्हर्षी बनारस बाबू गुरुजी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. 


यावेळी ब्रम्हर्षी बनारस बाबू गुरुजी बोलत होते. पुढे बोलताना ब्रम्हर्षी बनारस बाबू गुरुजी यांनी हैद्राबादमधील विविध भागांमध्ये अनेक स्वामी भक्तांची भक्ती पाहून स्वामींच्या दर्शनाकरीता येथे येण्याची प्रेरणा लाभली. यामुळेच आज येथे आल्यानंतर मंदीर समितीच्या सहकार्याने व महेश इंगळे यांच्या आदरतिथ्याने सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ घेता आल्याने मंदीर समितीचे आपण शतशः ऋणी असल्याचे मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, लेखापाल ओंकार उटगे,श्रीकांत मलवे, अविनाश सुरवसे, विपूल जाधव, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment