सारा न्यूज नेटवर्क -
फसवणुकीतील ९६ हजार रुपये परत मिळवून दिले,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांची कामगिरी..
तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले.
सोलापूर (प्रतिनिधी ) :- ऑनलाइन फसवणूकिची तक्रार मिळताच विजापूर नाका पोलिसांनी तातडीने हालचाली करून तक्रारदारास ९६ हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली. त्यामुळे तक्रारदार सादिक चौधरी (रा. सोलापूर) यांनी पोलिसांचे आभार मानले.
चौधरी यांची ९६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली होती. याबाबत त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एनसीसीआरपी सायबर पोर्टलच्या माध्यमातून संबंधित रक्कम 'होल्ड' केली. त्यामुळे ही संपूर्ण रक्कम चौधरी यांना परत मिळाली.
याबद्दल चौधरी यांनी पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलिस निरीक्षक सुशांत वराळे, पोलिस कॉन्स्टेबल उदय साळुंके व हवालदार संतोष चव्हाण यांचे आभार मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment