सारा न्यूज नेटवर्क -
राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात आसिफ मुल्ला आदर्श अभियंता म्हणून सन्मानित..
ठाणे (प्रतिनिधी) :- समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय "विकासरत्न प्रेरणा पुरस्कार व समृद्धी कला सादरीकरण सोहळा २०२६ हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली (पूर्व), मुंबई येथील अशोक सावंत हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत आकर्षक आणि संस्मरणीय ठरला.
आसिफ मुल्ला यांची कारकीर्द : या सोहळ्यात कर्नाटक विजयपूर येथील सिव्हिल इंजिनिअर आसिफ मुल्ला यांना त्यांच्या सिव्हिल इंजिनिअर क्षेत्रातील उल्लेखनीय,सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठित "आदर्श अभियंता विकासरत्न प्रेरणा पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गेली 20 वर्षे आसिफ मुल्ला यांनी या क्षेत्रात विविध कंपणी तसेच मुंबई,नांदेड एमजेपी, औरंगाबाद महानगरपालिका, सौदी, ब्राझिल, दुबई या ठिकाणी आँईल अँड गॅस मध्ये काम केलेले आहे. अशा मोठ मोठ्या शहरात काम केले आहे. अशा विविध ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केले आहे. सध्या मीराभायंदर येथे पी.एम.सी मध्ये आपली सेवा बजावत आहेत. .
मान्यवरांची उपस्थितीः
या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार व समाजकार्यकर्ते अँड. बाळासाहेब तोरस्कर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाशदादा सुर्वे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस सब इन्स्पेक्टर मंगेश अनंत नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. स्वागताध्यक्ष व संयोजिका म्हणून सौ. मीनाक्षी महादेव पाखरे यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले, तर ट्रस्टचे सचिव महेश महादेव पाखरे यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन केले. यावेळी राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त प्राध्यापिका व ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अलका नाईक तसेच डॉ. रावसाहेब नाना घोडेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात त्यांनी पत्रकारिता व समाजकार्य हे लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ असल्याचे सांगत, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सोहळ्यात कला, क्रीडा, साहित्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच विविध रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची शोभा अधिक खुलवली. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला. उत्कृष्ट नियोजन व भोजन व्यवस्थेची विशेष दखल कार्यक्रमासोबतच आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर व पाहुण्यांसाठी अत्यंत सुंदर, सुटसुटीत व नियोजनबद्ध पद्धतीने भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. स्वच्छता, शिस्तबद्धता आणि रुचकर खाद्यपदार्थ यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे मनापासून कौतुक केले. या व्यवस्थेमुळे कार्यक्रमाला अधिक चारचाँद लागले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment