Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, April 26, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - सोलापूरात आज वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन; दिग्गज मान्यवर कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार... सोलापूर (प्रतिनिधी) :- विशाखा महिला लोकसंपर्क साधन केंद्र, सोलापूर यांच्या वतीने तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संलग्न भाई छत्रुसिंह चंदेल समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क पदविका विभागाचा निरोप समारंभ' आज, रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) सकाळी १०.३० वाजता हॉटेल निसर्ग, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. डी. बी. गायकवाड, प्रा. डॉ. रवींद्र चिंचोळकर तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित राहणार आहेत. तसेच संतोष वामन व संतोष कडभाने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्र मास विशेष उपस्थिती म्हणून माजी महापौर संस्थापक अध्यक्षा नलिनी चंदेले, प्रा. मनीषा पाटील, प्राचार्य. सिद्धार्थ गायकवाड, प्रा. विजयकुमार लोंढे, प्रा. अंबादास भास्के, प्रदीप गायकवाड, प्रा. उज्वला साळुंखे, प्रा. विशाल पाटील, प्रा. संध्या इंगळे, प्रा. रवी देवकर व प्रा. केशव कोळी उपस्थित राहणार आहेत. या वेळी विद्यार्थ्यांचा सत्कार, पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. .... सारा न्यूज नेटवर्क संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment