Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 10, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त महाउपक्रमांचा शुभारंभ.. 

शिखर पहारिया फाउंडेशनने फुलविले हजारो चेहऱ्यावर हास्य.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने विविध १४ महाउपक्रमांद्वारे माणुसकीचा महोत्सव साजरा केला. उपस्थित हजारो महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. “अनंत” आनंदाचा शिधाने ५ हजार घरांची चूल उजळणार आहे.१४ ठिकाणी अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनाला मोठे बळ दिले.

प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटपसह शहर व जिल्ह्यात तब्बल १४ ठिकाणच्या विविध समाजोपयोगी महाउपक्रमांचा महाशुभारंभ कार्यक्रम गुरुवारी सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंडमधील मैदान येथे उत्साही वातावरणात पार पडला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे,फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर, धर्मराज गुंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष कुंडीत पाणी देऊन पर्यावरणाचा संदेश दिला. त्यानंतर महाउपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या, शिखर पहारीया फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस महा उपक्रमाने साजरा केला. “अनंत” माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा या महाउपक्रमाने दिली आहे.आपण वाढदिवस साजरा करत नाही, तर माणुसकीचा उत्सव साजरा करत आहोत. अनंत अंबानी यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा हा ‘अनंत’ प्रवास सुरू आहे.५ हजार कुटुंबांच्या चुली पेटवणे म्हणजे केवळ मदत नव्हे, तर आशेचा दिवा लावणे आहे असे सांगून फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment