Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, April 12, 2026

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क 

“स्वाक्षरीतून प्रेरणा”- आंबेडकर जयंतीनिमित्त उल्लेखनीय व्यक्तींचा सन्मान उपक्रम.

सोलापूर (प्रतिनिधी) :- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सोलापूरात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. जनता संघर्ष न्यूजच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचे प्रतीक असलेले विशेष पेन भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य सेवा, पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या उपक्रमातून गौरव केला जाणार असून, त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना आयोजक व पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे म्हणाले, “ज्ञान, समता आणि न्याय या बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जयंतीनिमित्त केवळ स्मरण न करता त्यांच्या विचारांचे आचरणात रूपांतर व्हावे, हीच अपेक्षा आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दीप पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment