सारा न्यूज नेटवर्क -
आता पत्रकारांना मिळणार पाच लाखांचे कर्ज विभागीय आयुक्त पुणे यांचे मा. उद्योग संचालनालय मुबंई यांना पत्र, पत्रकार सुरक्षा समितीच्या पाठपुरावाला यश..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करत असतो पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून काम करत असून समाजात घडणाऱ्या चांगल्या वा घटना तो समोर आणत असतो अनेक पत्रकार युट्युब पोर्टल त्याच बरोबर साप्ताहिक वृत्तपत्र चालवून आपली उपजीविका करत असून तुटपुंज्या मिळणाऱ्या जाहिराती मधून पत्रकारांची कौटुंबिक गुजरान होत नाही
पत्रकारिता बरोबर एखादा व्यवसाय करून पत्रकारांचे जीवनमान उंचवण्यासाठी राज्य सरकार ने प्रयत्न करायला पाहिजे, राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर व्यवसाय करून आपली कौटुंबिक उपजीविका करण्यासाठी विनातारण व विनाजामीन पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिनांक 11/11/2025
रोजी निवेदन सादर केले होते
त्याच बरोबर पुणे येथील विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन दिनांक 5/3/2026 रोजी समक्ष भेटून पत्रकारांना पूरक व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करण्याची विनंती करून निवेदन सादर करण्यात आले होते
पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची विभागीय आयुक्त पुणे यांनी दखल घेऊन पत्रकारांना व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मा उद्योग संचालनालय मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून पत्रकार सुरक्षा समितीच्या पाठपुरावा ला यश आले असून आता पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करून आपले जीवनमान उंचावण्यात हातभार लागणार आहे या बाबत पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्यातून कौतुक केले जात असून पत्रकारांसाठी नेहमीच निवेदन आंदोलन उपोषण करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीवर राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
Friday, April 24, 2026
SARA NEWS NETWORK
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment