Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 13, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ - सह धर्मादाय आयुक्त महेश लांबे 


अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.१३/०४/२६) :-  येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे देश विदेशासह राज्यभरात अनेक स्वामी भक्त आहेत. वटवृक्ष मंदिरातील भौतिक सौंदर्य येणाऱ्या भाविकांचे मन मोहून घेत आहे. नुकतेच आज स्वामी दर्शनाच्या कारणाने अक्कलकोटला येण्याचा योग आला. मंदीरातील स्वामी भक्तांची संख्या पाहून खुपच भारावलो. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमच्या मंदिरातील आगमनाची दखल घेऊन तात्काळ स्वागत व स्वामी दर्शनाची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे मन प्रसन्न झालेले आहे. या निमित्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ होत असल्याचे मनोगत महाराष्ट्र शासन मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे सह धर्मादाय आयुक्त महेश लांबे यांनी व्यक्त केले.


 ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सहकुटूंब भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सह धर्मादाय आयुक्त महेश लांबे व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कॄपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी मंदीर समितीच्या आदरतिथ्याबद्दल बोलताना सह धर्मादाय आयुक्त महेश लांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना सह धर्मादाय आयुक्त महेश लांबे यांनी वटवृक्ष मंदिरातले नियोजन उत्तम व आदर्शवत असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment