Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, April 27, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 🎤 स्पोर्ट्स न्यूज रिपोर्ट All India Inter-University Gatka Tournament 2025-26 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूची उल्लेखनीय कामगिरी.. सोलापूर :- राजस्थानमधील कोटा येथे आयोजित करण्यात आलेल्या All India Inter-University Gatka Tournament 2025-26 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा Association of Indian Universities यांच्या मार्गदर्शनाखाली University of Kota येथे 21 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 दरम्यान पार पडली. या स्पर्धेत देशभरातील विविध विद्यापीठांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सोलापूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत रमेश धोडमणी यांनी गटका (तलवारबाजी) प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत तिसरा क्रमांक मिळवला.
त्यांच्या या यशामुळे सोलापूर विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...... सारा न्यूज नेटवर्क संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment