Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, July 24, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ज्ञानासह संस्कारांची जोपासना;

सम्राट अशोक शिक्षण संकुलात दिंडी उत्साहात..!


सोलापूर :- सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, यशोधरा शिशु अध्यापिका विद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण संकुलात "आषाढी एकादशी" निमित्त शालेय परिसर भागात दिंडी काढण्यात आली. 



कॉलेजचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक - सुबोध सुतकर, प्रमुख उपस्थिती- मा. अंजली काकडे (विवाह नोंदणी अधिकारी- सो.म.पा), मा. संजय सावळगी (जन्म – मृत्यु विभाग- सो.म.न.पा), मा. अतुल फसाले (प्रतिनिधी- दिव्य मराठी, सोलापूर), संस्थेचे सदस्य- प्रा.डॉ. पंकज सुतकर, शाळेचे प्र.मुख्याध्यापिका- सुवर्णा भांगे, सुधीर वाघ – सेवाजेष्ठ शिक्षक यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून दिंडीला सुरूवात करण्यात आली.


शिक्षण संकुलातील बालवर्ग, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विट्ठल रुक्मीणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा विविध संतांचा पोशाख परिधान केले व तसेच ‘पर्यावरण विषयक व मुली वाचवा” या विषयी घोषणा व नाट्यीकरणाचे सादरीकरण तसेच ज्ञानोबा तुकाराम जय घोष करत वारकऱ्यांचा पारंपारीक पाऊल, अभंग, गवळण, भारूड गात उत्साहपूर्ण वातावरणात आषाढी एकादशी निमित्त परिसरात दिंडी काढण्यात आली.


संस्थेचे अध्यक्ष- मा. रमेश सुतकर व संस्थेचे सचिव- मा. विमल सुतकर यांनी “आषाढी एकादशी” निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना व परिसरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या..!



No comments:

Post a Comment