Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, July 29, 2026

SARA NEWS NETWORK

 



सारा न्यूज नेटवर्क - 

अक्कलकोट: गुंडगिरी व विकृत प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कर्दनकाळ म्हणून कर्तव्य बजावणार - नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे

पोलीस पाटील संघटना अक्कलकोटच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांचा सत्कार.. 

अक्कलकोट / दक्षिण पोलीस ठाणे : दक्षिण पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विनोद घुगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "गुंडगिरी व विकृती प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये कर्दनकाळ म्हणून कर्तव्य बजावणार" असा इशारा त्यांनी दिला आहे.


आज दक्षिण पोलीस ठाणे येथे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस पाटील, तसेच शहरातील मंदिर व मशिद ट्रस्टचे अध्यक्ष, पुजारी आणि मौलवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी घुगे साहेबांनी सर्व मंदिर व मशिद पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


तसेच पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पोलीस पाटलांनी पोलीस प्रशासनाला प्रामाणिकपणे व निपक्षपातीपणे मदत करावी, गोपनीय माहिती वेळेत द्यावी आणि महाराष्ट्र पोलीस पाटील अधिनियम १९६७ नुसार आपले कर्तव्य पार पाडावे.




बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना, अक्कलकोटच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ कोळी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष रहिमान आत्तार, उपाध्यक्ष महादेव पाटील, प्रसिद्धी प्रमुख श्रीशैल पाटील, जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्र आंदेवाडी, संतोष गुजा, सुरेश मैदर्गी, विजय चव्हाण, लग्न चिखले, जिल्हा कार्यकारणी सदस्य भौरम्मा माळी, महानंदा माळी, रोहिणी पवार, लालबी हन्नूरे, अर्चना पवार, रेश्मा पठाण, लक्ष्मीबाई बनसोडे, महादेवी अरवत, मोहन वाघमोडे, शैलेंद्र नडगम, मौलाली व्हसूर, शरण मुगळीमठ, संगिता माड्याळ, श्रीशैल कोगनूर आदी पोलीस पाटील उपस्थित होते.




No comments:

Post a Comment