Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, September 20, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 




 संघर्ष यात्री अभ्यासू पत्रकार सादिक शेख  यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर.. 


सोलापूर (प्रतिनिधी ) :- गेल्या नऊ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण पत्रकारांना पत्रकारिता बरोबरच पूरक व्यवसाय करून समाजामध्ये ताठ मानेने जगता यावे म्हणून राज्यातील पत्रकारांना विना अट व विना जामीन पाच लाख रुपये शासकीय बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे आंदोलन उपोषण निवेदनच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2026 चा आदर्श पत्रकार पुरस्कार साप्ताहिक यशसंघर्ष चे युवा व अभ्यासू पत्रकार सादिक शेख यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख यांनी दिली यांनी दिली आहे.



युवा अभ्यासू पत्रकार सादिक शेख यांचा परिचय

सोलापूर शहर सह इतर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणारा युवा पत्रकार म्हणून सादिक शेख यांनी समाजात आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून  त्यांनी  आपल्या कामाने प्रशासनात  दबदबा निर्माण केला आहे जनसामान्य माणसांच्या अडचणीत वेळोवेळी मदतीला धावून जाणारे समाजातील लोकांच्या मदतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे पत्रकार म्हणून विशेष ओळख असलेले सादिक शेख यांनी समाजातील सर्वच घटकासाठी आजपर्यंत अनेक आंदोलन उपोषण व निवेदनच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे  सादिक शेख यांनी केवळ सोलापूरातच नव्हे तर पुणे व मुंबई येथील आझाद मैदानात वंचिताच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळे आंदोलन केले आहेत त्यांनी 

 पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहरातील वंचित पीडित घटकाच्या हक्कासाठी साप्ताहिक यशसंघर्ष वृत्तपत्राच्या माध्यमातून  प्रशासन दरबारात आवाज काढून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या मूलभूत हक्कासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे साप्ताहिक यशसंघर्ष वृत्तपत्राच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय घडामोडीचा वेगवान आढावा घेत उत्कृष्ट पत्रकारिता केली आहे त्याच बरोबर पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून केलेल्या आंदोलन उपोषण मध्ये हिरीहिरीने भाग घेतला युवा पत्रकार सादिक शेख यांच्या सामाजिक कार्याची  व पत्रकारिता ची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार जाहीर झाल्याने सोलापूर शहर व धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून चळवळीतील  अभ्यासू व प्रामाणिक  पत्रकारला  राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार मिळत असल्याने समाजातून समाधान व्यक्त केलं जात असून युवा पत्रकार सादिक शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



No comments:

Post a Comment