Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, September 20, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर विद्यापीठात 'वर्षावास' निमित्त पालि विभागाकडून चार महिने ऑनलाईन मार्गदर्शन; दोन महिने यशस्वी पूर्ण.!

- सहाय्यक प्रा. विजयकुमार झुंबरे

प्रतिनिधी - महावीर रणखांबे


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पालि विभागाच्या वतीने 'वर्षावास' (वस्सावास) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या विशेष ऑनलाईन मार्गदर्शन उपक्रमाला दोन महिने पूर्ण झाले असून . मानवी कल्याणासाठी आणि समाजात धम्मविचारांचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठाचे सहाय्यक प्रा. विजयकुमार झुंबरे यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.


भारतीय संस्कृतीत आषाढ महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षावासाला बुद्ध धम्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तथागत बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाने पहिला वर्षावास सारनाथ येथे केला होता. पावसाळ्याच्या चार महिन्यांत प्रवास (चारिका) न करता एकाच ठिकाणी थांबून धम्मचिंतन करणे आणि उपासकांना मार्गदर्शन करणे हा यामागचा मूळ हेतू असतो.

 'वर्षावास हा दुःखमुक्तीचा आणि आत्मपरीक्षणाचा मार्ग आहे', असे प्रतिपादन प्रा. झुंबरे यांनी केले आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे, वेळोवेळी धम्मपद ऐकणे आणि त्यावर चर्चा करणे ही समाज परिवर्तनाची क्रांती आहे. आजच्या धकाधकीच्या दुःखमय  युगात मानवी मनाला शांती आणि योग्य दिशा मिळण्यासाठी हे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे.


 याच उद्देशाने सोलापूर विद्यापीठाच्या पालि विभागाने घरबसल्या डिजिटल माध्यमाचा वापर करून हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत दररोज रात्री ८:०० ते ९:०० या वेळेत गुगल मीट (Google Meet) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 'बुद्ध धम्मपद' या पवित्र ग्रंथाचे वाचन आणि सखोल चर्चा आयोजित केली जाते. या उपक्रमाचे यशस्वी दोन महिने पूर्ण झाले असून, पुढील दोन महिने हा ज्ञानयज्ञ असाच सुरू राहणार आहे. तरी जास्तीत जास्त उपासक आणि अभ्यासकांनी या सम्यक मार्गावर चालण्यासाठी खालील लिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


ऑनलाईन लिंक:

 https://meet.google.com/mjv-pgbn-dyv 

वेळ: दररोज रात्री ८:०० ते ९:००

संपर्क (प्रा. विजयकुमार झुंबरे): ८७९३९७७८९८

No comments:

Post a Comment