Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, September 17, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 उपमहापौर निवासस्थानी गौरी आगमनाचा उत्साह; 

  भक्तिमय वातावरणात स्वागत.. 

सोलापूर : - सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या निवासस्थानी ज्येष्ठा गौरी आगमनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.


पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या घरात गौरीमातेचे आगमन झाले. यावेळी देवकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गौरीचे औक्षण करून, फुलांची उधळण करत मंगलमय वातावरणात गौरीमातेचे स्वागत केले.



गौरी आगमनाने संपूर्ण घरात आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. घरातील ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.


यावेळी बोलताना उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या, "गौरीमाता ही सुख, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे. गौरीमातेच्या आगमनाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गौरीमातेच्या कृपेने सर्व सोलापूरकरांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच मनापासून प्रार्थना."

या मंगल प्रसंगी नातेवाईक आणि परिचितांनीही शुभेच्छा दिल्या.




No comments:

Post a Comment