Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, December 2, 2023

रेल्वे_महोत्सव_2023 उत्साहात संपन्न...



सारा न्यूज नेटवर्क - 

 रेल्वे स्टेशन स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात प्रादेशिक "वनविभाग सामाजिक वनीकरण" आणि "जीआयबी फाउंडेशन" चा सहभाग.

 सोलापूर(प्रतिनिधी) :- दिनांक एक डिसेंबर 2023 रोजी 163 वा सोलापूर रेल्वे स्टेशन स्थापना दिवस रेल्वे महोत्सव 2023 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोलापूर रेल्वे विभागाच्या या कार्यक्रमात वनविभाग प्रादेशिक, सामाजिक वनीकरण आणि जी आय बी फाउंडेशनने आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात वनविभाग व जी आय बी फाउंडेशन च्या वतीने #वन्यजीव_एक्सप्रेस  वन्यजीवांच्या छायाचित्रांचा, पिसांचा तसेच विविध वृक्ष आणि औषधी वनस्पतींच्या बिजांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनातून सोलापूरची जैवविविधता अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला .प्रदर्शनात विविध कीटक, फुलपाखरे, प्राणी आणि पक्षी यांच्या छायाचित्रांचा. उपवनसंरक्षक कार्यालय प्रादेशिक वनविभाग सोलापूर कडून मंडण्यात आलेले माळढोक, लांडगा, कोल्हा, काळविट चे पुतळे आकर्षणाचा केंद्राबिंदू ठरले आणि सेल्फिपॉईंट म्हणून लोकप्रिय ठरले. या प्रदर्शनाद्वारे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या नागरिकांना रेल्वे महोत्सवात सहभागी अभ्यासकांना जनजागृतीद्वारे वन्यजीव आणि जैवविविधता संरक्षण संवर्धन करणे बाबत माहिती देण्यात आली. 


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महाराज, आमदार  सुभाष देशमुख आमदार प्रणिती ताई शिंदे, यासह मध्य रेल्वेचे सोलापूर विभागीय परिमंडल अधिकारी  नागरिक उपस्थित होते.

 सोलापूर रेल्वे विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या रेल्वे महोत्सव 2003 कार्यक्रमांमध्ये 162 वर्षाची प्रगती डॉक्युमेंटरी च्या माध्यमातूनमांडण्यात आली. डॉक्टर व्यंकटेश मेतन  यांनी छायाचित्र सादरीकरणाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक, वन आणि प्रेक्षणीय बलस्थान असलेल्या स्थळांची आणि वैशिष्ट्यांची माहिती दिली. राजेंद्र अंकाराम यांनी त्यांच्या हातमागावरील विणलेल्या वॉल हैंगिंग चे प्रदर्शन भरवले होते. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीने या ठिकाणी रक्तदानाचे आवाहन करत रक्तसंकलन करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 


तर स्थानिक लोक कलाकारांनी खड्या बोली भाषेत मध्ये जय जय महाराष्ट्र माझा पारंपारिक साजरे करून उपस्थितांची मने जिंकली उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली आणि रेल्वे विभागाच्या कामकाजाबद्दल स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment