Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, December 3, 2023

सो.म.पा. नगर रचना बांधकाम परवाना विभागाच्या सारिका आकूलवार विरोधात यशवंत पवार यांची अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे तक्रार...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 सोलापूर (प्रतिनिधी ) :- सोलापूर  महानगर पालिका नगर रचना बांधकाम परवाना विभागात साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी शहरातील विविध भागातील सुरु असलेल्या इमारती ओनरशिप अपार्टमेंट बाबत बांधकाम परवाना  विभाग नगर रचना कार्यालय येथे माहिती अधिकारात माहिती मागितली होती.

 तब्बल तीन महिने उलटून गेले तरी ही नगर रचना कार्यालयकडून यशवंत पवार यांनी मागितलेल्या माहिती बाबत आजतगायत कोणतेही पत्र दिले गेले नाही व माहिती देखील दिली नाही.

शासकीय प्रशासनाचा कारभार लोकाभिमुख होण्यासाठी माहिती अधिकार आणला गेला परंतु या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे विदारक चित्र नगर रचना कार्यालय मध्ये दिसून येत आहे. अश्या अधिकाऱ्यांमुळे महापालिका प्रशासन बदनाम होत असून या कार्यालय मधील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलेला दिसत आहे जनमाहिती अधिकारी सारिका आकूलवार जाणूनबुजून माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब उघड झाली असून माहिती अधिकार कायदा पायदुळी तुडवडला जात आहे.

माहिती अधिकार कायद्याला हारताळ फासण्याचे काम हे अधिकारी करत आहेत.

*माहिती आयुक्त यांनी वारंवार दंड करून देखील सारिका आकूलवार त्याच पदावर कश्या राहात आहेत*?

नगर रचना कार्यालय बांधकाम परवाना विभाग मधील जन माहिती अधिकारी सारिका आकूलवार यांना वेळेत माहिती न दिल्याने  माहिती आयुक्त यांनी अनेक वेळा दंड केला आहे तरीही या नगर रचना कार्यालय मध्ये ठाण मांडून बसल्याआहेत त्यांना अभय कोणाचे? असा प्रश्न  साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी महानगर पालिका प्रशासन ला विचारला असून   माहिती अधिकार कायदा वारंवार पायदुळी तुडवणाऱ्या सारिका आकूलवार यांना अभय कोणाचे ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे

*सारिका आकूलवार यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे*

सोलापूर महानगर पालिका बांधकाम परवाना विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून काही चुकीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण महानगर पालिका बदनाम होत आहे त्यामुळे सारिका आकूलवार यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी केली आहे.

*सारिका आकूलवार यांच्यावर कारवाई करून अन्य ठिकाणी तात्काळ बदली करा*

माहिती अधिकारात मागवलेली माहिती वेळेत न देणे माहिती अधिकार कायदा पायदुळी तुडवणे पायमल्ली करणे तसेच थेट माहिती अधिकार कायद्याच्या मूळ हेतूला हारताळ फासणे असा प्रकार वारंवार नगर रचना कार्यालय बांधकाम परवाना विभागमधून होत आहे माहिती अधिकार अर्जाचे या विभागाला  गांभीर्य राहिलेले नाही.

त्यामुळे नगर रचना विभागाच्या सारिका आकूलवार यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची अन्य विभागात तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे केली आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment