सारा न्यूज नेटवर्क -
भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- केंद्र शासनाचा व महाराष्ट्र शासनाचा महत्त्वकांक्षी मुद्रा लोन सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योग धंदा करून उपजीविका करण्यासाठी प्रत्येक बँकेला केंद्राचे व महाराष्ट्र सरकारचे आदेश आहेत. प्रत्येक समाजातील सुशिक्षित रोजगारांना यासाठी मुद्रा लोन मंजूर झाले असून.
सोलापुरातील पारधी समाजातील अनेक सुशिक्षित तरुण तरुणीने याबाबत कागदपत्रे सर्व राष्ट्रीयकृत बँकेत प्रकरणे सादर केलेले आहेत. परंतु अद्याप पर्यंत एकाही पारधी समाजातील तरुण अथवा तरुणीला उद्योग व्यवसायासाठी केंद्र शासनाचा मुद्रा लोन अद्यापपर्यंत मिळालेला नाही त्यासाठी भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. व त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक युतीने मुद्रा लोन योजनेमधून आपापल्या व्यवसायासाठी कर्ज मागणी प्रस्ताव दाखल केले आहेत परंतु सदरचे दाखल प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबित असल्याने त्यांच्या प्रलंबित कर्ज मागणी प्रस्ताव आपण जातीने लक्ष घालून तात्काळ मंजूर करणेबाबत संबंधित राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक यांना आपल्या मार्फत आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.
त्याप्रसंगी समाजसेविका विमल काळे,फत्तेसिंग काळे,सावित्रा चव्हाण,प्रशांत काळे,मोनाली काळे, अभिजीत चव्हाण,हेमंत काळे व इतर पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment