Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, December 30, 2023

शहरातील बोगस डॉक्टर वर कारवाई करा यशवंत पवार यांची आरोग्य अधिकारी कडे तक्रार..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

शहरातील बोगस डॉक्टर वर कारवाई करा यशवंत पवार यांची आरोग्य अधिकारी कडे तक्रार.. 

सोलापूर (प्रतिनिधी ) :- सोलापूर शहरातील रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर वर महानगर पालिका आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसताना देखील सोलापूर शहरातील अनेक भागात डिग्री नसलेले अनेक बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे सोलापूर शहरी भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे मात्र सोलापूर महानगर पालिका आरोग्य विभागाकडून फारसे कारवाई चे पाऊल उचलले जात नाही शहरी भागातील गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने शहरी भागातील रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णादेखील कळत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत सोलापूर महानगर पालिका आरोग्य विभागाकडून शहरातील प्रत्येक डॉक्टर ची चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर सोलापूर शहरात उगडपणे व्यवसाय करत आहेत सोलापूर शहरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी सोलापूर महानगर पालिका आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी वैद्यकीय शिक्षण अथवा पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी आरोग्य अधिकारी सोलापूर महानगर पालिका यांच्याकडे केली आहे.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment