Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, December 10, 2023

मंगळवेढा येथे चांभार गल्लीचे "संत रोहिदास नगर" म्हणून नामांतर संपन्न...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मंगळवेढा येथे चांभार गल्लीचे "संत रोहिदास नगर" म्हणून नामांतर संपन्न.. 

मंगळवेढा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार जातीवाचक उल्लेख असलेल्या गल्ल्यांचा त्यांच्या संतांच्या नावावरून किंवा सोयीनुसार बदल करण्याचा आदेश जारी केलेला आहे . त्याप्रमाणे मंगळवेढा नगरपालिकेने चांभार गल्ली ऐवजी संत "रोहिदास नगर" असा बदल केलेला आहे .


 त्यानुसार मंगळवेढा येथे आज संत रोहिदास महाराजांचे उत्तराधिकारी संत श्री 108 गुरुदीपगिरीजी महाराज यांचे शुभ हस्ते नामफलकाचे अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला .सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री अविनाश शिंदे होते . या कार्यक्रमानंतर संत श्री गुरुदिपगिरीजी महाराज यांचा प्रबोधनपर सत्संग कार्यक्रम संपन्न झाला . त्यांनी अत्यंत मौलिक असे आपले विचार यावेळी प्रकट केले .



सदर कार्यक्रमास अमृतवाणी प्रचारक श्री बलराज सिद्धू श्री राजाभाऊ शिंदे पंढरपूरच्या माजी नगरसेविका व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्या सौ भाग्यश्री शिंदे श्री सचिन शिंदे पंढरपूर सचिन शिंदे मंगळवेढा आशुतोष साळे राजवर्धन शिंदे डॉ डीजी शिंदे डॉ नंदकुमार शिंदे डॉ पुष्पांजली शिंदे घनश्याम शिंदे सर लक्ष्मण शिंदे सर अजित शिंदे सर विजयकुमार शिंदे गजानन शिंदे संगम शिंदे भैरव शिंदे नंदकिशोर शिंदे भारत गवळी गोपाळ शिंदे स्वप्नील शिंदे. 

महेश खडतरे दत्तात्रय खडतरे संजय कांबळे सुधीर गवळी रा का  गवळी कल्याण गवळी वसंत शेकोकार महाराज मधुसूदन गव्हाळे रोहिदास क्षीरसागर ज्ञानू रायबान श्रीकांत शिंदे प्रकाश शिंदे नंदकुमार गवळी विशाल कांबळे मोहन कांबळे रमेश शिंदे दगडू शिंदे मल्हारी बंडलकर सुखदेव शिंदे पंपू गवळी इत्यादी जण उपस्थित होते संत श्री गुरुदीप गिरीजी महाराज यांच्या हस्ते डॉ डी जी शिंदे आणि सौ व श्री अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला ‌ श्री अविनाश शिंदे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले . श्री भारत मुढे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री घनश्याम शिंदे यांनी आभार मानले .


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment