सारा न्यूज नेटवर्क -
समस्त ग्रामस्थ बीबी दारफळ व गणेश भक्त मंडळी यांची जिल्हाधिकारी यांना कळकळीची(विनंती)निवेदन सादर...
सोलापूर (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी यांच्या नजरचुकीने राहिलेले एक विनंती अर्ज कृपया तात्काळ निकाली काढाव्यात अशी कळकळीची विनंती समस्त बीबी दारफळ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
निवेदनात समस्त ग्रामस्थ आणि गणेश भक्तांनी म्हटले आहे की, आम्ही सर्व गावक-यांनी व तसेच श्रीगणेश भक्त आम्ही आपणास दि. ०६/१०/२०२१ रोजी एक विनंतीपत्र आपल्या कार्यालयात दिलो असताना आपल्या नजरचुकीने किंवा आपल्या वरील कामाचा भार जास्त असल्या कारणाने आमचा विनंती अर्ज पाहण्यास आपल्याकडून झाला नसल्या कारणाने आज रोजी आम्ही पुन्हा एक विनंतीपत्र आपणासमोर सादर करीत आहोत व मागील काही पत्रव्यवहार केलेले प्रतिसुध्दा या अर्जाच्या पाठीमागे जोडून देत आहोत.
मा. जिल्हाधिकारी साहेब, आम्ही गावकरी व सर्व गणेश भक्त आपणास विनंती अर्ज करत आहोत की, आमच्या गावातील बीबी दारफळ गावामध्ये वडार गल्ली या ठिकाणी गेल्या ५२ वर्षापासुन श्रध्देचे स्थान म्हणून गणेश मंदिराची स्थापना आहे. गेल्या ५२ वर्षापासुन समस्त ग्रामस्थांच्या संमतीने हिंदू शास्त्राप्रमाणे प्रतिष्ठापना करुन स्थापना करण्यात आलेली होती. त्यावेळेस ही स्थापना सर्व गावक-यांच्या संमतीने करण्यात आली असल्या कारणाने तेंव्हापासून आजतागायत त्या जागृत गणेश मंदिराच्या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन पूजा अर्चना करणे, भजन किर्तन करणे अशा सर्व प्रकारच्या विधी पार पडत आहेत. तरी आमची कळकळीची विनंती आहे की,आमच्या सर्व गणेश भक्त मंडळी व समस्त ग्रामस्थत यांच्या विनंती अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावा.
यावेळी सोलापूर जिल्हा सहसंघटक दत्तात्रय पवार, योगेश सुळ जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस बाळकृष्ण सदाफुले, शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment