Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, December 20, 2023

शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करित राहणार..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करित राहणार - लैला जमादार

सोलापूर (प्रतिनिधी) :-  शासकीय योजना सर्व सामान्य गरीब बिडी कामगार, बांधकाम इमारत कामगार अशा सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी परिवर्तन फाऊंडेशन हे एक उत्तम व्यासपीठ आहे, असे जिल्हा महिला अध्यक्षा लैला जमादार यांनी बोलताना सांगितले. 

शासकीय योजनांविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, सर्व सामान्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे तसेच आपल्या हक्काबाबत जनजागृती करण्यासाठी फाऊंडेशन एक साधन उपलब्ध झाले असल्याचे मत महिला जिल्हा अध्यक्षा लैला जमादार यांनी व्यक्त केले.

आज एका गरीब निराधार महिलेस शासना कडून संजय गांधी निराधार पेंशन योजना लागू करण्यात येऊन एक छोटीशी आर्थिक मदत केली, त्याबद्दल त्या महिलेने खूप आभार व्यक्त केले. या कामाच्या पाठपुराव्यासाठी परिवर्तन फाऊंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष इक्बाल शेख यांनी सर्वतोपरी मदत केली. 

त्या महिलेला संजय गांधी निराधार पेंशन योजनेच मंजूर प्रमाणपत्र बहुजन हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी परिवर्तन फाऊंडेशनचे जिल्हा महिला अध्यक्षा लैला जमादार, प्रदेश उपाध्यक्ष इक्बाल शेख,  जिल्हा कार्याध्यक्ष अहमद काझी, झोपडट्टी सुरक्षा दलचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बेळळनवरू तसेच इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment