सारा न्यूज नेटवर्क -
हबीब बालक आश्रम मुलांना एका रोपाबरोबर एक वही आणि पेन म्हणून प्रेरणात्मक शाब्बासकी दिली.
सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा देशातील विविध भागात साजरा केला जातो. जगातील सर्व देशा मध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे, प्रदुषण ही एक जटिल समस्या बनली आहे. त्या विषयी जनजागरण मोहीम सुरू करणे आवश्यक आहे.
त्याचाच एक भाग म्हणून हबीब बालक आश्रम सोरेगाव येथे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसा निमित्त तेथील मुलांना घेऊन वृक्षारोपण करण्यात आले. त्यांना प्रदूषण नियंत्रणासाठी काय काय उपाय योजना आहेत त्या बद्दल माहिती देण्यात आली. त्या साठी त्यांना घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मुलांना एका रोपाबरोबर एक वही आणि एक पेन म्हणून प्रेरणात्मक शाब्बासकी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर, सारा सामाजिक संस्थाअध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे,अॅड. असिफ पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रमूख मान्यवरांचे स्वागत हबीब बालक आश्रमचे सुवर्णा बेलेताई मॅडम यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment