सारा न्यूज नेटवर्क -
ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने भारतरत्न ङाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...
सोलापूर (प्रतिनिधी) :-भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिन निमित्त जुना ऐप्लामेंट चौक येथ ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कार्यालय यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
या वेळी बोलताना ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज दादा गायकवाड म्हणाले की, हजारो वर्ष चालत आलेल्या वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करनारा हा खरा योद्धा आहे. जात, धर्म, वंश, पंथ, रूढी, परंपरा, रंग, भाषा, वेश, अन्न, इतिहास, भुगोल, हवामान, तापमान सगळ्या-सगळ्या बाबतीत प्रचंड वैविध्य असलेल्या या विशाल भूभागाला एक अखंड 'देश' म्हणून एकत्र बांधणारे.. प्रत्येक व्यक्तीला "स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय" ही मुल्यं देऊन स्वत:चा विकास करण्याचा अधिकार देणारं संविधान लिहीणारे खरेखुरे महानायक आहेत.
जय भीम _नमो बुद्धाय
त्या वेळी उपस्थित - ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा शिवराज (दादा) गायकवाड, विश्वास नागटिळक, यशवंत जाधव, छोटुलाल शाहु, जय काटे, दत्ता गायकवाड, गणेश कांबळे, राजु परदेशी, शुभम सुरवसे, सागर दोडमनी, बिराज लालसरी , अक्षय सलगर, सचिन शाहु आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment