Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, December 2, 2023

नवीन माध्यमिक हायस्कूल, औज(आ) मध्ये "आना पान" शिबीर संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

नवीन माध्यमिक हायस्कूल, औज(आ)  मध्ये "आना पान" शिबीर संपन्न. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील नवीन माध्यमिक हायस्कूल, औज (आ) व सुशीला प्रचंड खट्टे कनिष्ठ महाविद्यालय,औज(आ) या प्रशालेत आज विपश्यना प्रशिक्षणाची पूर्वतयारी "आनापाना" शिबिर संपन्न झाला.


या कार्यक्रमास औज गावचे सुपुत्र Ex.DYSP श्री.अर्जुन व्हनकडे साहेब, काडादी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.सुधाकर शिंदे सर,बार्शीचे श्री.उकरंडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना "आनापान" शिबिराचे प्रात्यक्षिक व महत्व सांगितले. या शिबिरात प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


याप्रसंगी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष श्री सिद्राम खट्टे सर यांनी विद्यार्थ्यांना मनोगत पर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घोडके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बोधले सर यांनी केले. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment