Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, December 24, 2023

एस.व्ही.सी.एस.हायस्कूल होटगी येथे " विपश्यना ध्यानधारणा मार्गदर्शन " संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

🧘‍♀️🧘‍♂️विपश्यना,ध्यानधारणा मार्गदर्शन* 🧘‍♂️🧘‍♀️

 सोलापूर (प्रतिनिधी) :- एस.व्ही.सी.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,होटगी येथे विपश्यना (ध्यानधारणा) या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे काडादी हायस्कूल चे माझी मुख्याध्यापक श्री शिंदे सर, तथा प्रशालेचे माझी विद्यार्थी व रिटायर्ड डीवायएसपी औज गावचे सुपुत्र श्री व्हनकडे साहेब तसेच श्री उकरंडे साहेब,(पोस्टाचे अधिकारी) कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. कौलगी सर, प्रशालेचे पर्यवेक्षक मा.श्री वांगीकर सर, तंत्र विभाग प्रमुख मा.गंगदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी विपश्यना म्हणजेच ध्यानधारणा करणे आधुनिक जीवनामध्ये किती गरजेचे आहे याचे महत्त्व विशद केले,निरोगी आयुष्य जगण्यासाठी ध्यानधारणा करणे अत्यावश्यक आहे हे विशद केले. याप्रसंगी विपश्यना म्हणजेच ध्यानधारणा यावर आधारित ऑडिओ क्लिप्स विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री होनमुर्गीकर सर यांनी केला. वरील कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक,शिक्षिका बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment