Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, December 7, 2023

विमानतळ जागेची विक्री महापालिका लिपिक निलंबित, आयुक्त शीतल तेली यांनी उगारला कारवाईचा बडगा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

विमानतळ जागेची विक्री महापालिका लिपिक निलंबित, आयुक्त शीतल तेली यांनी उगारला कारवाईचा बडगा.. 

सोलापूर (प्रतिनिधी ) :- होटगीरोड विमानतळाच्या मालकीच्या जागेची काही लोकांनी विक्री केली. त्यामध्ये सहभाग असलेल्या महापालिका मालमत्ता कर विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक वलीसाब शेख यांना निलंबित करण्यात आले. आयुक्त शीतल तेली यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणात महापालिकेचा वलीसाब शेख का कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे आली होती या प्रकरणाशी निगडित कब्जापावती आणी करारपत्राची छायाकिंत प्रत आदी कागदपत्रानुसार शेख हे कुलमुखत्यार असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे महापालिकाने त्यांना 10 ऑक्टोबर 2023 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती यावर शेख यांनी 12 ऑक्टोबर रोजी खुलासा केला होता.

फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस निरीक्षक विजापूर नाका यांच्याकडे अर्ज करून त्याची प्रत प्राधिकरणाकडे पाठवली आहे तक्रारीमधील मुद्दे गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळे ऍड कालेकर यांचा वैधानिक अभिप्राय घेण्यात आला लिपिक वलीसाब शेख यांची अधिकची चौकशी करणे गरजेचे आहे या चौकशीस बाधा पोहोचू नये म्हणून कनिष्ठ लिपिक यांना निलंबित करणे आवश्यक आहे असे महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी काढलेल्या आदेशात आहे.

  सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment