सारा न्यूज नेटवर्क -
*मानवाधिकार दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणारे मान्यवरांचा सत्कार व सन्मान.*
सोलापूर (प्रतिनिधी) :- दहा डिसेंबर मानवाधिकार दिनानिमित्त सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटना व काई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मानव अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार व सन्मान चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मानव अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानपत्र पेन गुलाबाचा फुल देऊन सन्मान करण्यात आला.
या सत्कार समारो कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून सामाजिक कार्यकर्ते अबूबकर सय्यद, पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष राम हुंडारे,दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, ॲडव्होकेट अब्दुल शेख, दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप, डॉक्टर रजी सय्यद,ॲडव्होकेट अखिल ह्युमेने, सामाजिक कार्यकर्ते दीपक उडणचू , सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज कंपली,उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मानवाधिकार संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्वांचे लक्ष वेधले. मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख संघटनेच्या अनेक सामाजिक कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी काई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इमरान हवालदार, मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश संघटक श्रीकांत कोळी,प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, प्रदेश संपर्कप्रमुख महबूब कादरी, जिल्हाध्यक्ष चांद साहब मुजावर (c. m) जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास वंगा, परवेज मुल्ला, जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख, जिल्हा कार्य अध्यक्ष आरोग्य विभाग प्रवीण चांदेकर,जिल्हाध्यक्ष महिला विभाग नागमणी वगगु, शहर कार्याध्यक्ष बिपिन, शहर उपाध्यक्ष अजहर बिजापुरे, शहर अध्यक्ष महिला विभाग आयशा सय्यद, शहर कार्याध्यक्ष महिला विभाग आजरा शाहीन पठाण, शहर संपर्कप्रमुख फयाज मुल्ला, शेख उमर शेख, इरफान मुजावर, मुर्तूज शेख अमीर चांदा. या सर्वांनी अथक प्रयत्न केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment