Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, December 11, 2023

युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन..

 सारा न्यूज नेटवर्क - 


युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन.. 

सोलापूर (प्रतिनिधी):- डी.एस.टी.एस. मंडळ संचलित, युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रिडा सप्ताहाचे उ‌द्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उ‌द्घाटन प्रसंगी म.न.पा. केंद्र शाळा नबर २८ शाळेचे मुख्याध्यापाक मा. श्री. सुतार सर, हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते, संस्थेचे अध्यक्ष, मा. श्री. राजशेखर शिवदारे सर याच्या मार्गदर्शना खाली आयोजन करण्यात आले त्याच बरोबर व्ही जी, शिवदारे प्राचार्य मा. श्री सुत्रावे सर, तसचे क्रिडा प्रमुख मा.श्री.एम.बी पाटील सर, शाळेच्या शैक्षणिक सल्लागार सौ. अजली तिवारी मॅडम, शाळेच्या सदस्या डॉ.सौ. शुभदा उपासे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा बाजपेयी मॅडम यांच्या उपस्थितीत या क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.

सुप्रसिध्द ख्यातनाम खेळाडू ध्यानचद यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध खेळामध्ये प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रिडा ज्योत घेऊन क्रिडागणा भोवती रॅली घेऊन, आक्काशामध्ये उच फुगे सोडून या क्रिडा सप्ताहाची उत्साहात सुरूवात करण्यात आली

या क्रिडा सप्ताहामध्ये रनिंग रेस, कबडडी, खो खो, बॅक रेस, लेमन स्पुन, पोटॅटो रेस, सुर्य नमस्कार आशा विविध खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे क्रिडा शिक्षक श्री अमर पाटील सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment