३५ एकरांत साकारणार १०८ फुटी स्वामींची मूर्ती..
सारा न्यूज नेटवर्क-
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- बाह्यवळण रस्त्यावररा जघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात 35 एकरांत स्वामी समर्थ प्रकल्प साकारला जाणार असून याचा शुभारंभ 3 डिसेंबर ला झाला. या ठिकाणी १०८ फूट उंचीची स्वामी समर्थांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. नवीन राजवाडा प्रांगणात समारंभ पार पडला.
स्वामी समर्थांची प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ दिव्य दर्शन प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती वृषालीराजे शिवाजीराजे भोसले (सातारा) या होत्या.
☝️. सिनेअभिनेते अशोक कुलकर्णी यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकारत मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज) होते.
श्रीमंत मालोजीराजे भोसले म्हणाले विख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांना श्री स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत स्वामी नगरी अक्कलकोट मध्ये भव्य प्रमाणात साकारला जाणार आहे यासाठी सर्व स्वामी भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी अक्कलकोट संस्थानचे मानकरी बाबासाहेब निंबाळकर, श्रीमंत गोपाळ देव पटवर्धन, भगवान रामपुरे महेश नामपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनुभूती या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले.
या कार्यक्रमाला अँड. सयाजीराजे भोसले, अँड. जयाजीराजे भोसले, जयहिंद शुगर चेअरमन गणेश माने- देशमुख, जयप्रभादेवी राजे भोसले, सत्यशील ढमाले, मधुवंती ढमाले, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment