सारा न्यूज नेटवर्क -
*कुंभारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सहदेव ढेपे वर शास्तीची कारवाई करा सादिक शेख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.*
सोलापूर (प्रतिनिधी) :- माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे.
शासनयंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी 'माहितीचा अधिकार' या कायद्याची निर्मिती झाली आहे.
दक्षिण सोलापूर कुंभारी येथे ग्रामपंचायतच्या अनेक विषयावर साप्ताहिक यश संघर्ष व सोलापूर नामा 24 न्यूज चैनल चे संपादक सादिक शेख यांनी दिनांक 20 /06/2023 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वे माहिती मागितली असता आज पर्यंत कुठलीही माहिती ग्रामसेवक सहदेव ढेपे यांनी दिली नाही. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत 30 दिवसाच्या आत अवलोकूनसाठी पत्र सुद्धा सहदेव ढेपे यांनी सादिक शेख यांना दिला नाही.
त्यानंतर 26/09/2023 रोजी परत एकदा सादिक शेख यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 माहिती मागितले असता कुठलीही माहिती न देता परत एकदा ग्रामसेवक सहदेव ढेपे यांनी सादिक शेख यांना डावलण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या पायमल्ली करणारे ग्रामसेवक सहदेव ढेपे यांच्यावर माहितीचा अधिकार कायदा २००५-कलम ३ अन्वये अर्ज (जोडपत्र " अ "नियम ३ नुसार) चा अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसाच्या विहीत मुदतीत माहिती न देण्याप्रकरणी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20 (1) अनुसार दंड व कलम 20 (2 ) अनुसार शास्तीची कारवाई करा म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादिक शेख यांनी तक्रार दाखल केली आहे.
यापुढे राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ यांच्याकडे व माहिती अधिकार च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अशाच प्रकारे कुंभारी ग्रामपंचायतच्या विषयावर पाठपुरवठा सुरू राहणार व अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणणार अशी गवाही सादिक शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment