सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर लोहमार्ग पोलीसांची दमदार कामगीरी आरोपींकडून २,४१,०००/- रू. कि चे ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व मोबाईल केले हस्तगत.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे कडील कडील दाखल असलेले गु र नं. ८१/२०२२ कलम ३७९,३४ व तसेच गु र नं १७७/२०२३ कलम ३७९,३४,१७७ मध्ये आरोपी नामे १) मल्लीनाथ बसवराज आळंद वय ३० वर्षे राह. भाजीपाला मार्केटजवळ दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर, सद्या राहणार नेताजी शाळेजवळ निकमनगर सोलापूर जि. सोलापूर. २) शिवानंद मल्लीनाथ कुंभार वय ३९ वर्षे राह. मु पो दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर सदया राह. मु पो भंकलगी ता. सिंदगी जि. विजयपूर राज्य कर्नाटक ३) अंबादास विलास जाधव वय २५ वर्षे राह. मु पो दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर सदया राह. शिवलिंगनगर म्हैत्रे यांचे घराजवळ एमआयडीसी सोलापूर यांना नमुद गुन्हयात अटक करून त्यांचेकडुन १) ५४,०००/- रू कि. चे एक सोन्याचे चैन त्यास जाळीदार फुलाचे पेंडल असलेले १८ ग्रॅम वजनाचे जु.वा २) १५,०००/- रू कि चे एक सोन्याचे प्लेन अंगठी वजन ०५ ग्रॅम ३) १४०००/- रू कि. चे सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचे काळया रंगाचे मोबाईल फोन त्यात सिमकार्ड नसलेले, त्याचा आयएमईआय नं ३५७९५६०८२०४४९९३, ३५७०५७०८२०४४९९१ असे असलेले ४) ५०००/- रु कि चे चांदीची अंगठी त्यात खडा असलेला वनज १० ग्रॅम जु वा. ५) ६०,०००/- रु कि चे एक सोन्याचे ब्रासलेट १७ ग्रॅम वजनाचे जु वा. ६) ५३,०००/- रू कि चे एक सोन्याचे चैन १५ ग्रॅम वजनाचे जु वा. ७) १२,००० रू कि चे कानातील टॉप्स, ८) ८०० रू कि चे चांदीचे जोडवे, ९) रोख ३००० रूपये रोख रक्कम असे एकुण २,४१,०००/- रू चे ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व मोबाईल, रोख रक्कम असे हस्तगत करण्यात आले.
आरोपी हे प्रवाशी तिकीट काढून प्रवासादरम्यान प्रवाशांची झोपेचा फायदा घेवून प्रवाशांचे डोक्याजवळ ठेवलेले लेडीज पर्स मुददाम लबाडीने चोरून गुन्हे केले आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगीरी मा. पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे, श्री. तुषार दोषी मा.अपर पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे, श्री. गणेश शिंदे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) सोलापूर लोहमार्ग विभाग संगीता हत्ती मॅडम, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेचे मा. पोलिस निरीक्षक श्री. संतोष गायकवाड, सपोनि एम जे गुरव, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. संतोष गायकवाड, सपोफौ संजय जाधव, पो हवा रंगनाथ पवार, पो हवा प्रमोद सुरवसे, पो कॉ संतोष सवळी, पो कॉ परमेश्वर खरात, पो कॉ संतोष बाबर, यांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment