सारा न्यूज नेटवर्क -
रि पा इ च्या वतीने अल्पसंख्यांक दिन विविधकार्यक्रमाने साजरा करण्यात आला..
सोलापूर (प्रतिनिधी) :- आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिनाचे औचित्या साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्यांक विभाग सोलापूर च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सोलापूर शहर व जिल्यातील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा सत्कार करण्यात आला. सोलापूर रंगभवन चॊकातील समाजकल्याण केंद्र या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेहबूब तांबोळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष हे होते, या वेळी प्रा डॉ अब्दुल रेहमान गदवाल यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेतच अल्पसंख्यांक लोकांना संरक्षण दिलेले आहे त्या मूळे अल्पसंख्यांक समाजाला घाबरण्याचे काही कारण नाही.आजचे केंद्र सरकार हे अल्पसंख्यांक लोकांबद्दल दुज्याभाव करीत आहे, शिक्षणाच्या बाबतीत घटने मध्ये डॉ बाबासाहेब साहेबांनी दिलेले अधिकार हळू हळू कमी कारण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.असे सांगितले. तसेच धम्म रक्षिता कांबळे यांनी बौद्ध धम्म हा जगामध्ये पसरला आहे आणी तो मानववादी आहे आणी म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला, आणी तमाम भारतीयांना धम्माची दिक्षा दिली असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महबूब तांबोळी यांनी सध्याच्या वातावरणानुसार सर्व अल्पसंख्यांक धर्माच्या लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे तरच आपला विकास होणार आहे असे सांगितले.
या वेळी मान्य वरच्या हस्ते आस्था बहुउदेसीय सामाजिक संस्था संचलित अस्था रोटी बँक, परिवर्तन फौंडेशन, युवक क्रीडा मंडळ, कायनाथ बहुउदशीय सामाजिक संस्था, मनावधिकार संरक्षण संघटना, उडान सोशल फौंडेशन,जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सारा सामाजिक बहुउदशीय संस्था, ओमसाई महिला बहुउदशीय संस्था, माहेदिया सोशल फाऊंडेशन, आधार फाऊंडेशन बार्शी इत्यादी संस्थेचा व संस्थेच्या पदाधीकारी यांचा शाल पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
या वेळी रि पा इ चे प्रदेशअध्यक्ष सुबोध वाघमोडे, माणिक आठवले, सुखदेव साबळे, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज दादा गायकवाड श्रीमंत गायकवाड, धर्मा माने, संगराज बिराजदार, सलीम मुल्ला, इम्रान शेख, इब्राहिम शेख, नसरीन शेख, रफिक शेख,संदीप ससाणे, कविता ससाणे, पूनम मोरे, संगीता शिरसागर, कल्लाप्पा बनसोडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रचे सूत्र संचालन रावसाहेब परीक्षाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मा माने यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment