Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, December 25, 2023

राज्यस्तरावरिल आदर्श सरपंच पुरस्काराने उंबर्डेचे सरपंच महेश पाटील सन्मानित..

 सारा न्यूज नेटवर्क - 


राज्यस्तरावरिल आदर्श सरपंच पुरस्काराने उंबर्डेचे सरपंच महेश पाटील सन्मानित..

अहमदनगर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील सर्व सरपंचाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील नोंदणीकृत संघटना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने नुकतेच महेश पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबर्डे पेन रायगड यांना माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले. 

यावेळी सत्कारमूर्ती बाबासाहेब पावसे यांनी बोलताना सांगितले आपले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन आपण गावचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायत ज्या माध्यमातून विविध योजनांच्या साह्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौकिक मिळवला, आपल्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने आपणास आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपण आपल्या पुढील काळातही असे सामाजिक कामे करण्यासाठी ईश्वरशक्ती देऊ, आपल्या पुढील भावी कार्यास सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. 

यावेळी उपस्थित मान्यवर बाबासाहेब पावसे रोहित संजय पवार सुजाता कासार रवींद्र पावसे प्रदेशाध्यक्ष संस्थापक विश्वस्त कार्य कार्याध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी स्वराज्य सरपंच सेवा संघ सदस्य उपस्थित होते पेन मधील हितचिंतक लक्ष्मण पाटील गुरुजी रामभाऊ ठाकूर उद्योगपती मनोज पाटील विजय भोईर मुकेश पाटील विश्वनाथ माळी कल्पेश मोकल निळेश पाटील विनायक पाटील मनोज पाटील वसंत म्हात्रे इत्यादी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment